मुंढर, ता. गुहागर येथून वन्य जीव वाघ व बिबटयाची नखे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडुन जप्त,वाघ व बिबटयाची १८ नखे जप्त
. पोलीस उपमहानिरीक्षक संजय मोहिते, . क्षेत्रीय उपनिदेशक, डब्लुसीसीबी वारकड योगेश निळकंठ नवी मुंबई यांचे पुढाकाराने नुकताच रत्नागिरीआणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांसाठी वन्य जीव संरक्षणाच्याअनुषंगानेवेबीनारआयोजित केला होता. सदरवेबीनारमध्ये वन्य जीव कायदयासहित पर्यावरणाचा समतोलराखण्यासाठी वन्य जीव संरक्षण का आवश्यक आहे याची माहिती देण्यात आली होती.
या अनुषंगाने मा. डॉ. मोहित कुमार गर्ग, पोलीस अधीक्षक, रत्नागिरी यांनी वन्य जीवसंरक्षणाच्या अनुषंगाने कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने गतकालावधीत
हातखंबा येथे दहशतवाद विरोधी कक्षातील पथकाने वन्य जीव खवले मांजराची खवले पकडलेहोते.या पार्श्वभुमीवर दि. ०६/०७/२०२१ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत गोपनिय माहितीमिळाली कि, गुहागर येथील मौजे मुंदर, ता. गुहागर येथे काही इसम वन्य प्राणी वाघ याचीनखे विक्री करीता घेवुन येणार आहेत. या बातमीच्या आधारे मुंढर फाटातेगिम्हवी या रस्त्यावरदोन इसम एका मोटार सायकलसह संशयास्पद असलेले दिसले. त्यांची झडती घेतली असता सदर दोन इसमांपैकी दिलीप सिताराम चाळके, वय ४० वर्षे, रा. चाळकेवाडी, मुंढर, ता.गुहागर याचे ताब्यातुन वन्य जीव वाघ व बिबटयाची १८ नखे जप्त करण्यात आली. याबरोबरच सदर आरोपींकडे असलेली मोटर सायकल व मोबाईल फोन अशी वर नमूद नख्यांचीकिंमत वगळता ५८,०००/- रु. ची मालमत्ता जप्त करण्यात आली.
सदरबाबत पोहवा शांताराम रामचंद्र झोरे, नेमणुक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, यांचेफिर्यादी वरुन गुहागर पोलीस ठाणे येथे गु.नों क्र.९५/२०२१, कलम ३९,४४,४८.५१ वन्य जीवप्राणी संरक्षण अधिनियम, १९७२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यात वर
नमूद आरोपी (१) दिलीप सिताराम चाळके व (२) अक्षय आत्माराम पारधी, वय २४ वर्षे, रा.आमशेत, पेवे, भोईवाडी, ता. गुहागर यांना अटक करण्यात आली आहे.सदर गुन्ह्याचा तपास श्री. दिपक कदम, पोलीस उप निरीक्षक, गुहागर पोलीस ठाणे हे
करीत आहेत.मा. पोलीस अधीक्षक, डॉ. मोहित कुमार गर्ग यांचे मार्गदर्शनाखाली सदर कामगिरीत
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोहेकॉ/.शांताराम झोरे, प्रशांत बोरकर सुभाष भागणे, नितीन
डोमणे, बाळू पालकर, उत्तम सासवे, पोकॉ/ दत्तात्रय कांबळे यांनी सहभाग घेतला. सदरकारवाईत वनरक्षक श्री. संजय बाबुराव दंडगे यांनी सहभाग घेतला.
www.konkantoday.com