
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मा.संपर्क अध्यक्ष मा.भुषण विचारे व उपतालूकाध्यक्ष पंकज पंगेरकर यांनी पडवे गावासाठी कोविड साहित्य उपलब्ध करून दिले
कोरोना या महामारीच्या जागतिक संकटाचा सामना आज देशातील जनता करीत आहे.हे संकट आज ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर घोंघावत आहे.या संकटाचा सामना करताना आपल्याला बऱ्याच गैरसोयींना तोंड दयावे लागत आहे.काही ठिकाणी तर अनेक उपकरणें, साधने उपलब्ध होत नसल्याचे दिवसेंदिवस हे संकट उग्र रूप धारण करीत आहे. हे संकट राजापुर तलुक्यातील पडवे ग्रामपंचायत हद्दीतही हातपाय फैलावत आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी सामाजिक भावनेतून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मा.संपर्क अध्यक्ष मा.भुषण विचारे व उपतालूकाध्यक्ष पंकज पंगेरकर यांनी पडवे गावासाठी कोविड साहित्य उपलब्ध करून दिले आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेना *अणसुरे विभागातर्फे पडवे ग्रामपंचायत कार्यालयात *सरपंच सौ.रुची विलास बाणे ,उपसरपंच श्री.संतोष(बबन) तांबे ,ग्रामसेवक कोर्लेकर*यांच्या उपस्थितीत *आॉक्सीमीटर,पीपीई कीट,ह़ँड सॕनिटायझर,मास्क,स्टीमर*भेट देण्यात आले.त्याचप्रमाणे *विलगिकरण कक्षाची सॕनिटायझर फवारणी करण्यासाठी इलेक्ट्रिक पंप मोफत*उपलब्ध करून देण्यात आलं आहे.यावेळी *विभाग अध्यक्ष श्री.राकेश कणेरी ,शाखाध्यक्ष श्री.संकेत वाडेकर,शाखाध्यक्ष स्वप्नेश पाटीलशाखा अध्यक्ष, योगेश कणेरी ,उपशाखाध्यक्ष आशिष दसुरी ,महाराष्ट्र सैनिक ओंकार पाटील ,सम्राट पाटील,प्रफुल्ल भोसले,विलास बाणे*उपस्थित होते.यावेळी सरपंच,उपसरपंच यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या मदतीबद्दल आभार व्यक्त केले.
www.konkantoday.com