रत्नागिरी-दादर पॅसेंजर गाडी सुरु करण्याची रिपाईची मागणी
– खेड- कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरीवासीयांची हक्काची रत्नागिरी-दादर-रत्नागिरी पॅसेंजर गाडी त्वरित सुरू करावी, अशी मागणी करणारे निवेदन रिपाईचे कोकण प्रदेश रिपाईचे संपर्क प्रमुख सुशांतभाई सकपाळ कोकण रेल्वेचे विभागीय वेवस्थापक याना देणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे
त्यांनी पुढे असे म्हटले आहे की, ऐतिहासिक वास्तूंचा वारसा, सांस्कृतिक वारसा, दळणवळणाची साधने, पर्यटन हे कोकणाचे वैशिष्ट्य आहे. कोकण रेल्वे हासुद्धा कोकणाचा मानबिंदू असून तो कोकणातील जनतेच्या अस्मितेचा ठसा आहे. या मार्गावर सर्वांत प्रथम सुरू झालेली रत्नागिरी-दादर-रत्नागिरी पॅसेंजर गाडी गेल्या वर्षी करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून बंद आहे. सुरुवातीला या गाडीचा मार्ग दादर ते रत्नागिरी आणि रत्नागिरी ते दादर असा होता. पण खेदजनक बाब म्हणजे या गाडीचा मार्ग वाढवून ती गाडी थेट मडगावपर्यंत करण्यात आली. त्यामुळे ती रत्नागिरीकरांची एकमेव हक्काची गाडी राहिली नाही. ही गाडी दादर-रत्नागिरी मार्गावर ५०१०३ या क्रमांकाने, तर पुढे रत्नागिरी ते मडगाव मार्गावर ५०१०१ या क्रमांकाने धावते. परतीच्या प्रवासात मडगाव-रत्नागिरी मार्गावर ५०१०२, तर रत्नागिरी-दादर मार्गावर ५०१०४ या क्रमांकाने धावते. त्यामुळे रत्नागिरीकरांची हक्काची गाडी नाहीशी झाली आहे. त्यामुळे ही गाडी
कोकण मार्गावरून धावणारी मध्य रेल्वे ची मुंबई मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस सुपरफास्ट नसतानाही प्रवशाकडून सुपरफास्ट रेल्वेचे तिकीट दर आकारत आहेत रेल्वे प्रशासन प्रवाशाकडून जादा शुल्क आकारत असल्याचं आश्र्चर्य व्यक्त केले जात आहे मार्च महिन्या पासून बंद करब्यात आलेल्या बहुतांश रेल्वे गाड्या ऐवजी मेल एक्स्प्रेस च्या नंबरच्या बदल करून विशेष तिकीट दराने या गाड्या चालवण्यात येत आहेत.१० फेब्रुवारी पासून कोकण मार्गावर जनशताब्दी एक्स्प्रेस चालण्यात येत आहे मात्र ही जनशताब्दी एक्स्प्रेस सुपरफास्ट नसतानाही प्रवाशांना कडून सुपरफास्टचे शुल्क आकारले जात असल्याने प्रवाशांना भुदड सहन करावा लागत आहे रेल्वे च्या नियमानुसार कोणत्याही गाडी सुपरफास्ट होण्यासाठी तिच्या दोन्ही दिशांचा सरासरी वेग किमान५५.की.मी.असणे आवश्यक असते जनशताब्दी एक्स्प्रेस प्रमाणेच कोकण मार्गावर धावणाऱ्या अन्य रेल्वेगाड्याही सुपरफास्ट नसतानाही सुपरफास्ट शुल्क आकारले जात आहे हे कुठे तरी थांबले पाहुजे अन्यथा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने रेल्वे रोको आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात येत आहे तसेच
पूर्वीप्रमाणेच दादर रत्नागिरी आणि परत या मार्गावर चालू करावी, असे त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात सकपाळ यांनी म्हटले आहे.
www.konkantoday.com