मुंबई-गोवा महामार्गाच्या सुरक्षेकडे लक्ष द्या -हायकोर्टाचे निर्देश
मागील महा वर्षापासून मुंबई-गोवा महामार्गावरील चौपदरीकरणाचे काम संथ गतीने सुरू आहे. महामार्गावरील ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाणही वाढले असून या अपघातात नाहक बळी जात आहेत. पावसाळा सुरू झाल्यामुळे सुरक्षिततेच्या उपाययोजनांकडे तातडीने लक्ष द्या, असे निर्देश हायकोर्टाने सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिले आहेत. चिपळुणातील मुंबई उच्च न्यायालयाचे वकील ओवेस पेचकर यांनी नव्याने दाखल केलेल्या जनहित याचिकेची २ जुलै रोजी उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेत हे निर्देश दिले आहेत.
www.konkantoday.com