छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे बनवण्यात आलेल्या छोट्या मुलांच्या कोविड सेंटरमध्ये गैरसोयींमुळे राहण्यास बाधित मुलांच्या मातांचा नकार

रत्नागिरी शहरातील छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या क्रीडा संकुलातील बॅडमिंटन कोर्ट येथे लहान मुलांसाठी कोविड सेंटरची निर्मिती करण्यात आलीआहे त्याचा शुभारंभ काही दिवसांपूर्वी पार पडला होता दोन दिवसांपूर्वीपर्यंत ठिकाणी कोणतीही बाधित मुले व मातांची भरती झालेली नव्हती या सेंटरमध्ये मुलांसाठी विविध खेळणी व टीव्ही व मुलांसाठी वेगळे उपक्रमही ठेवण्यात आहेत त्यामुळे हे सेंटर मुलांना चांगले वातावरण मिळेल अशी प्रशासनाची अपेक्षा होती या ठिकाणी सामाजिक न्याय भवन येथून बाधित मुलांना व त्यांच्या मातांना या क्रीडा संकुलातील काेविड सेंटरमध्ये अचानक हलवण्यात आले मात्र या ठिकाणी आल्यानंतर मुलांच्या मातानी याठिकाणची व्यवस्थेबाबत नाराजी व्यक्त केली या सेंटरमध्ये काॅटची व्यवस्था नसून मुलांसाठी व मातांसाठी खाली गाद्या घालण्यात आल्या आहेत तसेच या ठिकाणी असलेले साइड पंखेदेखील जमिनीवरच असल्याने ते मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक होऊ शकतात तसेच या ठिकाणी शौचालयाची पुरेशी व्यवस्था नाही तसेच पाण्याचीही कमतरता आहे अशा तक्रारी व अडचणीचा पाढा याठिकाणी आलेल्या मुलांच्या मातांनी प्रशासनासमोर मांडला याठिकाणी आलेल्या बाधित मुलांच्या मातांनी या ठिकाणी राहण्यास नकार दिला मुलाला राहण्यास योग्य वातावरण नसल्याचा आक्षेप त्यांनी नोंदवला आम्हाला परत सामाजिक भवन येथे हलवण्यात यावे अशी त्यांनी मागणी लावून धरली शेवटी आरोग्य विभागाने बाधित मुलांना व मातांना परत सामाजिक भवन येथे पाठवण्याचा निर्णय घेतला व त्यांना तेथे परत पाठविण्यात आले
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button