रत्नागिरी नगरपरिषद म्हणते आम्ही नाही दिली परवानगी

काही दिवसांपूर्वी रत्नागिरी शहरात मोबाइल व्हॅन गाडी द्वारे झालेले दिव्यांगांसाठीच्या लसीकरणा याबाबत नगरपरिषदेने आता कानावर हात ठेवले आहेत याप्रकरणी भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी याबाबत आवाज उठवला होता
माजी आमदार डॉक्टर विनय नातू यांनी रत्नागिरी नगर परिषदेला लेखी पत्र पाठवून दिनांक २७/ २८/ २९ मे रोजी दिव्यांग व्यक्ती करीता झालेल्या मोबाइल लसीकरणाला अधिकृत
परवानगी दिली होती का याची माहिती घेण्याबाबत पत्र लिहिले होते
त्याला उत्तर देताना रत्नागिरी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी मे महिन्यात झालेल्या मोबाइल लसीकरणाला रत्नागिरी नगर परिषदेने परवानगी दिली नसल्याचे लेखी खुलासा केला आहे आता नगरपरिषदेच्या परिषदेच्या या लेखी खुलाशामुळे नवा प्रश्न उपस्थित होत आहे नगरपरिषद नाही म्हणत असली तरी या कार्यक्रमाला मंत्री महोदय व नगराध्यक्ष यांचीदेखील उपस्थिती होती
नगर परिषदेची परवानगी नसताना हे मोबाइल लसीकरण झालेच कसे असा सवाल आता माजी आ.डॉ. विनय नातू यांनी उपस्थित केला आहे
याबाबत बोलताना भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी म्हटले आहे की दिव्यांग व्यक्तींच्या लसीकरणाला आपला कोणताही विरोध नव्हता फक्त ते चुकीच्या पध्दतीने होत असल्याने त्याला आक्षेप होता त्यामुळे काहीजणांकडून आपण दिव्यांगाच्या लसीकरणाच्या चांगल्या उपक्रमाला विरोध करीत असल्याचे भासवून आपली प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आता नगरपरिषदेच्या लेखी खुलाश्यामुळे ही सर्व ही वस्तुस्थिती जनतेसमोर स्पष्ट झाल्याचे त्यांनी म्हटले आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button