
पाचल ग्रामपंचायतीने रिफायनरीच्या समर्थनाचा एकमुखी ठराव मंजूर केला
रिफायनरी प्रकल्प कोकणात राहणार की विदर्भात जाणार यावरून सध्या जोरदार चर्चा सुरू आहे प्रस्तावित रिफायनरीच्या समर्थनार्थ आता प्रकल्प क्षेत्राबाहेरील ग्रामपंचायती पुढे सरसावल्या आहेत. तालुक्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत असलेल्या पाचलने रिफायनरीच्या समर्थनाचा एकमुखी ठराव मंजूर करून तालुक्यातच प्रकल्प राहावा, अशी मागणी केली आहे.
गेल्या अनेक वर्षांत उठावदार कामगिरी करताना शासनाचे विविध पुरस्कार प्राप्त करणाऱ्या पाचल ग्रामपंचायतीने राजापूर तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ एकमुखी ठराव केला आहे याआधी राजापूर नगरपरिषदेनेही रिफायनरीच्या समर्थनार्थ ठराव मंजूर केला होता
www.konkantoday.com
