दोन महिन्यात जिल्ह्यातील ३ हजार बालके कोरोनाने बाधित
जिल्हा प्रशासन अजूनही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे उपाययोजना करीत असतानाच तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादाय आहे असे सांगण्यात येत आहे आतापर्यंत दोन महिन्यात जिल्ह्यातील ३ हजार बालके कोरोनाने बाधित झाल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. विशेष म्हणजे ज्या व्हेरिएंट ऑफ कन्सर्न (डेल्टा प्लस) धास्ती संपूर्ण जगाने घेतली आहे त्या विषाणूच्या नव्या प्रकाराने रत्नागिरीतील ३ बालके यापूर्वीच बाधित झाली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी दिली आहे. त्यामुळे केवळ प्रशासनाचं नव्हे तर जनतेनेही सतर्क होणे आवश्यक झाले आहे.
www.konkantoday.com