निसर्ग चक्री वादळात नुकसान झालेल्या मंडणगड बसस्थानक व आगाराचे इमारतीची डागडुजी नाही
निसर्ग चक्री वादळात मंडणगड बसस्थानक व आगाराचे इमारतीचे नुकसान झाले. यास एक वर्षांचा कालावधी पुर्ण झालेला असला तरी वादळामुळे नुकसान झालेल्या इमारतीचे डागडुजी करण्याची तसदी आगार व्यवस्थापक वा स्थानीक व्यवस्थापनाने घेतलेली नाही. त्यामुळे प्रवशांसह कर्मचाऱ्यांना यंदाच्या पावसात विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
निसर्ग चक्री वादळात बसस्थानक व आगाराचे इमारतीचे छप्पराचे नुकसान झाले. त्यामुळे ठिकठीकाणी गळीत लागली. त्यामुळे प्रवाशांना गळती लागलेल्या बसस्थानकात गाड्यांची वाट पहात बसावे लागले तर कर्मचाऱ्यांच्या गळक्या आगारात भिजत काम करावे लागले आहे.
www.konkantoday.com