खंडाळा घाटातील निसर्गाची मज्जा लुटता यावी याकरीता प्रथमच डेक्कन एक्स्प्रेसला व्हिस्टाडाेम काेच
मुंबई-पुणे दरम्यान रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लाेणावळा, खंडाळा घाटातील निसर्गाची मज्जा लुटता यावी याकरिता प्रथमच या मार्गावरील डेक्कन एक्स्प्रेसला व्हिस्टाडाेम काेच लागणार आहेत. शनिवार म्हणजेच २६ जूनपासून व्हिस्टाडाेम काेच असलेली डेक्कन एक्स्प्रेस धावणार आहे. या काेचच्या काचेच्या छतामधून प्रवाशांना रोटेबल सीटमधून १८० डिग्रीमध्ये निसर्ग पाहता येणार आहे.कोकण रेल्वेवरील दादर-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसला १८ सप्टेंबर २०१७ रोजी व्हिस्टाडोम डबा जोडण्यात आला होता.त्याला प्रवाशांची प्रचंड मागणी आहे. मुंबई-पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांची डेक्कन एक्सप्रेसला खुप पसंती आहे. त्यामुळे डेक्कन एक्सप्रेसला व्हिस्टाडाेम काेच जाेडण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला. काेराेनाच्या संक्रमणामुळे गेल्या काही दिवसांपासून डेक्कन एक्स्प्रेस बंद हाेती. आता शनिवारपासून व्हिस्टाडाेम काेचसह ही एक्स्प्रेस धावेल. या काेचमध्ये बसून प्रवाशांना घाटातील साैदर्य न्याहाळता येणार आहे. खासकरुन पावसाळ्यात घाटातील धबधबे आणि आकाश पाहण्याची मज्जा निराळीच राहणार आहे.
www.konkantoday.com