कुवारबाव ग्रामपंचायतीच्या पाणी पट्टी दरवाढीवरून भाजपचे पदाधिकारी व सरपंचांकडून ग्रामस्थांची दिशाभूल

सरपंचांनी राजीनामा द्यावा यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना ग्रामपंचायतीचे अकरा सदस्यांनी निवेदन दिल्याची उपसरपंच सचिन कोतवडेकर यांची माहिती

कुवारबाव ग्रामपंचायतीची नळपाणी योजना २६ लाखानी तोट्यात आहे त्यामुळे हे नुकसान भरून काढण्यासाठी पाणीपट्टी दर वाढवण्याचा निर्णय सरपंच व सदस्यांनी घेतला होता तसा ठराव मंजूर करण्यात आला होता असे असताना कुवारबाव येथील ग्रामस्थ व भाजपचे पदाधिकारी सतेज नलावडे हे खोट्या बातम्या देऊन ग्रामस्थांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप उपसरपंच सचिन कोतवडेकर यांनी आज पत्रकार परिषदेत केला या दरवाढीला ग्रामस्थांचा कोणताही विरोध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे तसेच भाजपच्या असलेल्या सरपंच सतत आपली भूमिका बदलत आहेत भाजपच्या या सरपंचांनी राजीनामा द्यावा यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्य अधिकारी यांना २१ जून राेजी तक्रारीचे निवेदन उपसरपंचांसह दहा सदस्यांनी दिले असल्याची माहिती कोतवडेकर यांनी यावेळी दिली यामध्ये त्याने सरपंचांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे याशिवाय ठरावात बदल करणे चुकीच्या नावावर ठराव टाकणे आदी आरोप केले आहेत
या पत्रकार परिषदेत त्यांनी मुख्य कार्य अधिकारी जिल्हा परिषद यांना दिलेल्या निवेदनाची प्रत सादर केली या निवेदनावर उपसरपंचासह दहा सदस्यांच्या सह्या आहेत या निवेदनात असे म्हटले आहे की
या पत्राद्वारे आम्ही सर्व सदस्य कुवारबांव ग्रामपंचायत सरपंच विरोधात खालीलप्रमाणे तक्रार करत आहोत.
कुवारबांव ग्रामपंचायत पाणीपट्टी नळपाणी योजना पाणीपट्टी वाढीची सध्या जोरदार चर्चा चालू आहे. भाजपाच्या पदाधिकार्‍यांनी स्वतःच्या पक्षाच्या सरपंचांच्या विरोधात पाणीपट्टीवरून रणशिंग फुंकून उपोषणाचा इशारा दिला आहे.
माहे जानेवारी २०२१ च्या मासिक सभेच्या विषय पत्रिकेवर कुवारबांव सरपंच यांनी न.पा.पु. योजना, पाणीपट्टी दरवाढ करणेबाबत चर्चा करणे हा विषय ठेवला होता. सभेपुढे प्रशासनाच्या वतीने नळपाणी योजनेचा तपशीलवार अहवाल ठेवला होता. सरपंचांनी पाणीपट्टी दरवाढ किती असावी यासंबंधी ठोस आकडेवारी सुधारित दरासह सभेपुढे ठेवली होती. सदर दरवाढ न केल्यास पाणी योजना बंद पडू शकते आणि पाणी योजना २६ लाख रुपये तोट्यात असल्याचे सरपंच यांच्याकडून सदस्यांना सांगण्यात आले. त्यामुळे सदरचा ठराव हा सरपंचांनी अध्यक्षपदावरून मांडला आणि सर्वानुमते हा ठराव मंजूर करण्यात आला. सदरचा ठराव हा प्रशासनाकडून ठेवण्यात आल्यामुळे इतिवृत्तामध्ये नमुद करताना अध्यक्षपदावरून असा उल्लेख येणे आवश्यक होते परंतु सरपंचांनी इतिवृत्त लिहिताना चालाखीने सूचक सचिन कोतवडेकर व अनुमोदक स्नेहल वैशंपायन यांची नावे ठरावावर दाखल केली.
ठरावात बदल करणे, चुकीच्या नावावर ठराव टाकणे ह्या त्यांचा खोडसाळ सवयींना कंटाळून सदस्यांनी त्यांच्याविरोधात माहे डिसेंबर २०२० महिन्यामध्ये मा. गटविकास अधिकारी, पंचायत समिती रत्नागिरी यांच्याकडे तक्रार केली आहे.
माहे फेब्रुवारी २०२१ च्या सभेमध्ये जानेवारी २०२१ च्या इतिवृत्तामध्ये हरकत घेण्यात आली आणि सदर ठराव हा अध्यक्षपदावरून मांडला होता. त्यामुळे तसे इतिवृत्तात नमुद करणे आवश्यक असताना हेतुपुरस्सर सदस्यांच्या नावावर टाकण्यात आल्या होत्या. ठराव दुरूस्त करण्याच्या अटींवर इतिवृत्त मंजूर करण्यात आले. सरपंचांनी सदरची दुरूस्ती इतिवृत्तात घेणे आवश्यक होते. परंतु नेहमीच्या खोडसाळ सवयीनुसार इतिवृत्तामध्ये दुरूस्ती घेणे जाणुनबुजून टाळले.
परंतु माहे २०२१ च्या सभेमध्ये पुन्हा सदरची दुरूस्ती न आल्याचे सदस्यांच्या निदर्शनास आले व सदस्यांनी या इतिवृत्तामध्ये हरकत घेतली आणि इतिवृत्तामध्ये या ठरावाबाबत दुरूस्ती का घेतली नाही, असा जाब विचारल्यावर आणि आता इतिवृत्ताची मंजुरी देणारच नाही असे मांडल्यावर हा ठराव अध्यक्षपदावरून झाल्याचे मान्य करून नाईलाज झाल्यामुळे ठराव अध्यक्षपदावरून आणि सर्वानुमते मंजूर असे नमूद केले आहे.
माहे एप्रिल ०९.०४.२०२१ या तारखेला सरपंचांनी मा. गटविकास अधिकारी, पंचायत समिती रत्नागिरी यांना पत्र पाठवून ग्रामपंचायत कुवारबांव नळपाणी योजना २६ लाख ताेट्यात असून दरवाढीचे सुधारित दर सर्वानुमते मंजूर झाले असून सुधारित दर प्रस्तावावर मार्गदर्शन करणे बाबत कळविले होते.
मा. गटविकास अधिकारी, पंचायत समिती रत्नागिरी यांचे मार्गदर्शन आल्यानंतर दिनांक १ जून २०२१ आणि २ जून २०२१ रोजी सरपंचांनी सुधारित दरवाढीची बिले ग्रामस्थांना पाठवून दिली होती परंतु ही बिले पाठवून झाल्यानंतर दिनांक १० जून २०२१ रोजी सरपंचांनी मा. गटविकास अधिकारी, पंचायत समिती, रत्नागिरी यांना ग्रामसभेची मंजुरी नसताना दरवाढ करता येते का असे पत्र पाठवल्याचे निदर्शनास येत आहे. हा त्यांचा अकार्यक्षमतेचा पुरावाच आहे.
नव्या करप्रस्तावानुसार काही नळधारकांना दरवाढीची बिले बजावल्यानंतर आता सरपंच मॅडम स्वतःच म्हणतात की सभागृहामध्ये ठेवण्यात आलेला अहवाल व दरवाढ हा प्रस्ताव हा चुकीचा आहे आणि माझा ह्या दरवाढीला विरोध आहे. याचा अर्थ या सभागृहाची आणि ग्रामस्थांची दिशाभूल करीत आहेत. आणि कोणाच्यातरी डोक्यावर खापर फोडावे म्हणून विरोधी सदस्य आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या डोक्यावर खापर फोडत आहेत. त्याच बरोबर ग्रामपंचायत क्लार्क आणि सदस्यांची बदनामी चुकीची माहिती ग्रामस्थांसमोर आणत आहेत. याबाबतीत आम्ही पुढील मासिक सभेमध्ये हक्कभंग ठराव घेण्याचा निर्णय घेतला आहे. सभेचे इतिवृत्त मंजूर होवून त्याच्यावर अंमलबजावणी झाल्यावर २ ते ३ महिन्यांनी बेजबाबदारपणे माझा दरवाढीला विरोध होता ही त्यांच्या अकार्यक्षमतेची पोचपावती आहे.
सरपंचांच्या पाठिशी बहुमत नाही. त्या अल्पमतात आहेत. असे त्या मान्य करतात. मग नैतिकता म्हणून त्यांनी आपल्या पदाचा त्वरित राजीनामा द्यावा, त्यांनी केलेला खोटारडेपणा आणि सदस्यांची केलेली बदनामी याचा आम्ही सर्व सदस्य निषेध करत आहोत.
पाणी कमिटी सभा लावणे हे सरपंचांच्या अधिकारातील विषय असून कोरोनाच्या कालावधीमध्ये सुरक्षित अंतर व नियमांचे पालन करून गावातील १० ते १५ ग्रामस्थांची सभा लावणे आवश्यक होते. ग्रामसभेची मंजुरी घेवून दरवाढ करावी व पाणी कमिटीची सभा लावावी असे सुद्धा काही सदस्यांनी सुचवले होते. परंतु निर्णय घेण्याची क्षमता नसणार्‍या सरपंचांनी ग्रामस्थांच्या हरकतीचा विचार न करता दरवाढ केली आहे.
ग्रामस्थांचे अर्ज गहाळ करणे. सभेपुढे शासकीय पत्रव्यवहार न ठेवणे हा गुन्हा असून ह्या सरपंच मॅडम बिनधास्तपणे हे गुन्हे करत असतात.
ग्रामसभा लावणे, पाणी कमिटी सभा लावणे हे सरपंचांचे अधिकार असतात. कोरोनाच्या काळामध्ये सुरक्षित अंतर ठेवून पाणी कमिटीची सभा लावणे त्यांना शक्य झाले असते किंवा ग्रामसभेची मंजुरी घेवूनच दरवाढ अंमलबजावणी करायला हवी होती. तशी चर्चा आणि सूचना काही सदस्यांनी त्यांना फेब्रुवारी महिन्यात केली होती. आणि त्यांनी ती मान्यही केली होती. परंतु निर्णय घेण्याची क्षमता नसणार्‍या या मॅडमनी कोणालाही कल्पना न देता १ ते २ जून २०२१ या तारखांना दर वाढीची बिले पाठवून दिली. यासंदर्भात आम्ही मा. जिल्हाधिकारी, रत्नागिरी आणि मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्याकडे तक्रार अर्ज २ ते ३ दिवसामध्ये करणार आहोत.
१४ वा वित्त आयोगमधील क्रीडा साहित्य खरेदी भ्रष्टाचारांचे आरोप या सरपंच मॅडमवर सिद्ध झाला असून त्यांचा अपात्रतेचा प्रस्ताव पंचायत समिती स्तरावरून वरिष्ठ कार्यालयाकडे गेला असून या मॅडम खोटं बोलणे आणि प्रकरण अंगाशी आल्यावर हात झटकणे याशिवाय कोणतेही कर्तृत्व त्यांनी गेल्या दोन वर्षामध्ये दाखविलेले नाही. भ्रष्टाचाराच्या इतर बाबींची चौकशी आम्ही लवकरच लावणार असून त्यामध्ये स्ट्रीटलाईट खरेदी, कोरोना काळात केलेला खर्च इत्यादी बाबी आहेत.
केलेल्या कार्यवाहीवर आणि अंमलबजावणीवर सरपंच जबाबदार राहतो. असा सरपंच गावाला लाभणे हे दुर्दैवच म्हणावे लागेल. आदर्श लोकशाही व्यवस्थेत अशा खोटारड्या सरपंचांनी त्वरित राजीनामा द्यावा अशी मागणी कुवारबांव ग्रामस्थ त्यांच्या कारभारांना कंटाळून करत आहेत. गावामध्ये चुकीची माहिती पसरवून दिशाभूल करणार्‍या सरपंचांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात यावी ही विनंती.
निवेदन देणार्‍यांवर
सचिन यशवंत कोतवडेकर (उपसरपंच), जीवन विनायक कोळवणकर-सदस्य, सौ. स्नेहल संजय वैशंपायन -सदस्य, नरेश विठोबा विलणकर-सदस्य, सौ. सुनिला सुनिल नलावडे-सदस्य, सौ. रंजना राजेंद्र विलणकर-सदस्य, सौ. वैदेही सनी दुदवडकर-सदस्य, चेतन प्रकाश सावंत-सदस्य, सौ. रिया तुषार सागवेकर-सदस्य, सौ. साक्षी स्वरूप भुते-सदस्य, रमेश अशोक चिकोडीकर-सदस्य. आदींची नावे आहेत
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button