देवरूख मातृमंदिर संचलित एसएमएस हॉस्पिटलच्या डेडीकेटेट कोविड हेल्थ सेंटरला जिल्हा बँकेने एक लाखाचा निधी दिला
देवरूख मातृमंदिर संचलित एसएमएस हॉस्पिटलच्या डेडीकेटेट कोविड हेल्थ सेंटरला जिल्हा बँकेने एक लाखाचा निधी दिला आहे. बँक संचालक तथा आमदार शेखर निकम यांच्या हस्ते एक लाखाचा धनादेश कार्याध्यक्ष अभिजित हेगशेट्ये यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
यावेळी जिल्हा बँकेचे सीईओ सुनिल गुरव, जनरल मॅनेजर अजय चव्हाण, संचालक राजेंद्र सुर्वे, सौ. नेहा माने, आदींसह सतिश शिर्के, बाळू ढवळे, नगरसेवक प्रफुल्ल भुवड, निलेश भुवड, पंकज पुसाळकर आदी उपस्थित होते.
www.konkantoday.com