
मांडव्याला रो रो बोटीतून उतरणाऱ्या पर्यटकांची अँटीजेन टेस्ट करण्याचा निर्णय
लॉकडाऊनचे निर्बंध थोडे शिथील केल्यानंतर पर्यटनस्थळी पर्यटकांनी पुन्हा गर्दी करायला सुरुवात केली आहे. मुंबईपासून जवळ असलेले अलिबाग हे पर्यटकांचे पसंतीचे पर्यटनस्थळ आहे. इथे गर्दी वाढून कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून रायगड जिल्हा प्रशासनाने विशेष उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. रो रो बोटसेवेमुळे मुंबईहून पर्यटकांना वाहनासकट अलिबागला जलदगतीने येता येऊ लागले आहे. ही बाब लक्षात घेता जिल्हा परिषदेने मांडव्याला रो रो बोटीतून उतरणाऱ्या पर्यटकांची अँटीजेन टेस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.
www.konkantoday.com