रत्नागिरी जिल्ह्याच्या आरोग्य अधिकारी डॉ बबिता कमलापूरकर यांचे निलंबन होण्याऐवजी राजाश्रयामुळे बदलीवर भागले ,बेकायदा लसीकरण शिबीर प्रकरणही शेकले

रत्नागिरी जिल्ह्याच्याआरोग्याधिकारी डॉ बबिता कमलापूरकर यांच्याबाबत कोरोनाची परिस्थिती हाताळताना केलेल्या बेफिकीरपणामुळे जिल्हा आरोग्य विभागाचे प्रतिमा खराब झाली होती त्यामुळे त्यांच्या विरोधात वरिष्ठांच्या अनेक तक्रारी असतानादेखील राजकीय राजाश्रयामुळे त्यांचे निलंबन ऐवजी बदलीवर भागले आहे वरिष्ठ अधिकार्यांना वरिष्ठांना विश्वासात न घेता आठवडा बाजार येथील केतन मंगल कार्यालयात लसीकरण शिबिराचे आयोजन केले होते त्याबाबत भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी हे प्रकरण उघडकीला आणून त्याचा पाठपुरावाही केला होता पटवर्धन यांनी उघड केलेले हे प्रकरणही कमलापूरकर यांना भोवले आहे त्यामुळे कमलापूरकर यांचा गैर कारभार उघड झाला होता आरोग्य अधिकारी असलेल्या कमलापूरकर यांच्याविरोधात मागील मुख्य कार्य अधिकारी बगाडे व सध्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ इंदुराणी जाखड यांनी प्रधान सचिव आरोग्य विभाग यांच्याकडे अहवाल पाठवून निलंबनाची शिफारस करून कारवाईची मागणी केली होती मात्र राजकीय राजाश्रयामुळे कमलापूरकर यांची केवळ पुणे येथे बदली करण्यात आली आहे
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्य अधिकारी डॉ इंदूराणी जाखड यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बबिता कमलापूरकर यांच्या गैरकारभाराबाबत दिनांक १४ मे रोजी मुख्य सचिव आरोग्य विभाग यांना एक अहवाल पाठवला होता त्यामध्ये
रत्नागिरीजिल्हयातडॉ.बबिता कमलापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी वरील अधिनियम, सूचना व आदेशांचे तंतोतंत अनुपालन करुन साथरोग नियंत्रण करण्या साठी जिल्हयातील वैद्यकिय यंत्रणा सतर्क करुनकामकरणेआवश्यकहोते.तथापि,रत्नागिरीशहरातीलआठवडाबाजार परिसरातील केतन मंगल कार्यालय येथे लसीकरण केंद्र सुरु करणेबाबत/लसीकरण सत्र आयोजितकरणेबाबत कोणतीही पूर्व कल्पना न देता अथवा मान्यता न घेता दिनांक २४.०४.२०२१ रोजी रत्नागिरीशहरातील आठवडा बाजारपरिसरातील केतन मंगल कार्यालय येथेकोविड-१९ लसीकरण सत्राचे आयोजनकेले. तसेच सदर लसीकरण केंद्रावर कोविड-१९ च्या दृष्टीने मार्गदर्शक सूचनांचे पालन होणे आवश्यक होते.परंतु तसे झालेले नाही. लसीकरण केंद्रावर नागरीकांनी मोठया प्रमाणावर गर्दी केलेली दिसून आली. लसीकरणकेंद्रावर केलेल्या बैठक व्यवस्थेमध्ये सामाजिक अंतर राखलेले दिसून आलेले नाही. सदर लसीकरण केंद्रावरकोविड-१९ मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन झालेले आहे. या घटनेमुळे विविध प्रसिध्दी माध्यमांद्वारे प्रसिध्दझालेल्या बातम्यांमधून जिल्हयातील नागरिकांमध्ये जिल्हा प्रशासनाच्या कोविड-१९ कामकाजाबाबत संभ्रमता वसंशय निर्माण झाल्याने जिल्हा प्रशासनाची व जिल्हा परिषदरत्नागिरी यांची मानहानी झालीयाबाबत सर्वस्वी जिल्हाआरोग्यअधिकारी या व्यक्तीशः जबाबदार असून त्यांनी जाणीवपूर्वक बेफिकिरपणा दर्शविला आहे.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बबिता कमलापूरकर यांनी Front Line Workers, पंचायत राजसंस्थांमधील कर्मचारी, अन्य राज्य शासनाच्या कार्यालयातील जनसंपर्कात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना तसेचजिल्हयातील नागरीकांच्या लसीकरणाबाबत पुढाकार घेवून आवश्यक ते नियोजन करून त्यानुसार काम करणेअपेक्षित आहे. परंतु याबाबत वारंवार सूचना देवूनही प्रत्यक्षात मात्र तसे झालेले दिसून आले नाही. लसीकरणाच्या
एकंदर नियोजनामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दुर्लक्ष करून हलगर्जीपणा केलेला आहे. तसेच वारंवारसूचना देवूनही जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी कोविड केअर सेंटर (CCC) च्या नियोजनामध्ये तसेच एकंदरसनियंत्रणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम १८९७ व महाराष्ट्र कोकोड १९ उपाययोजना नियम, २०२० तसेचआपत्ती व्यवस्थापन अधिनियम२००५अन्वयेजिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनप्राधिकरण, रत्नागिरी यांनी वेळोवेळी निर्देशित केलेल्या कर्तव्यात तसेच सदर covID -19 अंतर्गत प्रतिबंधउपाययोजना अंतर्गत कार्यान्वयन अधिकारी म्हणून उक्त पूर्व तयारी व प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी सनियंत्रकम्हणून घोषित केलेले असतानाही विहित केलेली कर्तव्ये नियोजितपणे पार पाडलेली नाही व त्यांनी सदर कामातसमन्वय ठेवलेला नाही.जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी COVID-19यामहाभयंकरमहामारीच्या अनुषंगाने शासनाकडूननिर्देशित प्राप्त सूचना, निर्देश व सल्ला (advisory) यांचे बारकाईने अवलोकन न करता आवश्यकते सनियंत्रणन ठेवलेने तसेच आवश्यकते निर्देश कार्यान्वयन यंत्रणेकडे उचितरित्या निर्देशित करण्यात अक्षम्य बेपर्वाईदाखविलेने क्षेत्रीय स्तरावरील वैद्यकिय यंत्रणेत कमालीची संदिग्धता निर्माण झालेली आहे. त्यामुळे जिल्हयामध्येआरोग्ययंत्रणाहाताळणे मध्ये प्रशासनाची प्रतिमा मलिन झाली आहे.महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम, १९७९ चे नियम १४ (१) नुसार स्थानिक प्राधिकरण
म्हणजेच जिल्हा परिषद रत्नागिरीस ज्यांच्या सेवा उसन्या दिल्या असतील अशा जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या
बाबत सदर अधिकाऱ्यासनिलंबनाधिन ठेवणेच्या प्रयोजनाकरीता नियुक्ती प्राधिकरणाचे शिस्तभंगविषयक
प्राधिकरणाचे अधिकार असतील. त्यानुसार नियम १४ (२) अन्वये सदर अधिका-याची सेवा उधार देणाऱ्या
प्राधिकरणाला निलंबनाचा आदेश देणेबाबत किया त्याच्याविरुष्ट शिस्तभंगविषयक कार्यवाही सुरु करण्यासकारणीभूत ठरणारी परिस्थिती कळवील असे नमूद आहे.
यापूर्वीही डॉ.बबिता कमलापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे मागील सन २०२० कोविड-१९प्रादुर्भावावेळी देखीलकेलेल्याअक्षम्यबेफिकिरपणामुळे त्यांचेविरुध्द विभागीय चोकशी प्रस्तावित करणेकामी दोषारोप जोडपत्र १ ते ४ संदर्भिय क्र.६ अन्वयें सादर करणेत आले आहेत.सदर जोडपजातील दोषारोपामध्ये वाढ
करणेसाठी पुरवणी दोषारोप यासोबत पुढील कार्यवाहीसाठी सादर करणेत येत आहेत.वरील सर्व बाबींचा विचार करता मागील शिस्तभंगविषयक कार्यवाही प्रलंबित आहे. तसेच डॉ.बबिताकमलापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी त्यांचे पदाच्या कर्तव्यात कसूर,हलगर्जीपणा व गोंधळ सदृश्य परिस्थिती निर्माण करुन जाणीवपूर्वक कोविड-१९ साथरोग नियंत्रण, लसीकरण
नियोजन व एकंदरीत कोविड-१९ संदर्भातील कामकाजात अडथळे आणीत असलेबाबत या प्राधिकरणाचे स्पष्टमत आहे. तरी महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम १९७९ मधील प्रकरण दोन (४) नुसार डॉ.बबिताकमलापूरकर, जिला आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी यांना तात्काळ निलंबित करणेत यावेअशी स्वयंस्पष्ट शिफारस करणेत येत असून यावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती मागील कोराेनाच्या काळात देखील आरोग्य अधिकारी कमलापूरकर यांनी कामात हलगर्जीपणा दाखविला होता त्यावेळचे जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी बगाटे यांनी कमलापूरकर यांच्याविरोधात वीस दोषारोप असणारे पत्र वरिष्ठांना पाठवले होते त्यावर कोणतीही कारवाई झाली नव्हती सध्या कमलापूरकर यांची बदली करण्यात आली आहे
याप्रकरणी आपण वरिष्ठांकडे पाठपुरावा करणार असल्याचे युवा नेते अनिकेत पटवर्धन यांनी सांगितले आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button