जिल्ह्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी घरांचे व रस्त्यांचे नुकसान

जिल्हा नियंत्रण कक्षाडुन सकाळी 10 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती पुढीलप्रमाणे आहे.
दापोली तालुक्यात मौजे पाजपंढरी येथे भागवत हरीचंद्र पावसे यांचे घरांचे पावसामुळे अंशत: नुकसान 15 हजार रुपये नुकसान झाले आहे. मौजे शिरसोली येथील काशिनाथ बाळा जाधव यांचे घराचे पावसामुळे अंशत: 4 हजार 400 रुपये नुकसान झाले आहे. मौजे शिरसोश्वर येथील बाळाराम रामजी डेवणकर यांचे घराचे पावसामुळे 3 हजार 950 एवढे नुकसान झाले आहे. मौजे शिरासोली येथे दिनकर विष्णू जाधव यांचे घराचे पावसामुळे 1 हजार 600 रुपये नुकसान झाले आहे. मौजे शिरसाडी येथील वसंत काशिनाथ वाजे यांच्या घराचे पावसामुळे अंशत: 2 हजार 800 रुपये नुकसान झाले आहे. मौजे गिम्हवणे येथील चांदणी चंद्रकांत यादव यांचे घराचे पावसामुळे अंशत: 8 हजार 450 रुपये नुकसान झाले आहे. मौजे माटवण येथील सार्वजनिक पाण्याच्या टाकीची एका बाजूकडील संरक्षक भिंत पडून अंशत: 4 हजार 500 रुपये नुकसान झाले आहे.
चिपळूण तालुक्यात मौजे कळकवणे-आकणे-तिवरे येथील रस्त्यावर दरड कोसळली होती. सदर ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने दरड हटविण्याचे काम चालू. पर्यायी रस्ता आकळे-कादवड-तिवरे रस्ता चालू आहे. मौजे टेटव येथील लिंगेश्वर मंदिराची संरक्षक भिंत कोसळल्याने अंशत: 24 हजार रुपये नुकसान झाले आहे.
गुहागर तालुक्यात मौजे पडवे येथील समजाद रशिद भिरगावकर यांचे घराचे पावसामुळे अंशत: 10 हजार रुपये नुकसान झाले आहे. कोणतीही जिवीत हानी नाही. मौजे अडूर येथील सुरेश काशिनाथ रसाळ यांचे घराचे पावसामुळे अंशत: 25 हजार रुपये नुकसान झाले आहे. कोणतीही जिवीत हानी नाही. मौजे पडवे येथील कैसर रमजान शिरगाव यांचे घराचे पावसामुळे अंशत: 9 हजार रुपये नुकसान झाले आहे. कोणतीही जिवीत हानी नाही.
संगमेश्वर तालुक्यात मौजे कुचांबे येथील राजू गोविंद काजवे यांचे घराचे पावसामुळे अंशत: नुकसान झाले आहे. मौजे पांगरी येथील सूर्यकांत सागवेकर यांच्या घराचे पावसामुळे अंशत: 5 हजार 400 रुपये नुकसान झाले आहे. मौजे पुरे देवळे बौध्दवाडी येथील सिध्दार्थ पवार यांच्या घराचे अंशत: नुकसान झाले आहे. मौजे तुळसणी येथील जलऊदीन अस्ली बोट यांच्या पिण्याच्या पाण्याच्या पक्क्या विहीरीचे पावसामुळे अंशत: 1 लाख 50 हजार रुपये एवढे नुकसान झाले आहे. मौजे तुळसणी येथील ग्रामपंचायत जवळील मोरीचे पावसामुळे कोसळून अंशत: नुकसान झाले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button