वर्षभर काम केलेल्या सागर मित्रांना वर्षभर पगार नाही ,मत्स्य विभाग मात्र सागर मित्रांची करीत आहे नव्याने भरती
रत्नागिरी ( आनंद पेडणेकर ) भारत सरकारने बराच गाजावाजा करून ३२ लाखाहून अधिक मच्छिमार लोकाना रोजगार उपलब्ध करण्यासाठी मत्स्य विभागातर्फे ” सागर मित्र ” ह्यापदासाठी भरती केली गेली. भरती झालेल्या सागर मित्र वाड्या वस्त्या गाव त्याना नेमून दिलेल्या ठिकाणी स्वखर्चाने जावून आपले काम करत आहेत . अर्थसंकल्पात या योजनेसाठी मोठा भरीव निधी दिला असताना ही या सांगर मित्राना एकत्रीत मेहताना (पगार) वर्षभर मिळालेला नाही . वेळोवेळी मत्स्य विभागाकडे चौकशी केली असता निधी उपलब्ध नाही तो अद्याप आलेला नाही असे सांगितले जातेय खरोखर निधी आला की नाही ? हे मत्स्य व्यवसाय अधिकारी यांनी या बद्दल जरूर खुलासा करणे गरजेचे आहे सागर मित्रांचे रखडलेले पगार त्वरीत देण्याच्या दृष्टिने सकारात्मक विचार करावा अशी मागणी होत आहे रोजगार नसल्याने बेरोजगार विना मेहनताना काम करत आहेत. केंद्र सरकारकडून सागर मित्राची ही घोर फसवणूक चालवली आहे.
एकीकडे वर्षभर राबलेल्या सागर मित्रांना मानधन मिळाले नसतानाच आज मत्स्य विभागा कडून सागर मित्रांसाठी नव्याने भरती करण्याचे व मुलाखती घेण्याचे काम सुरू होते त्यामुळे मत्स्य विभाग सागर मित्र हे पालखीचे भोई असल्यासारखे खांदे पालट करत आहे अनेकानी वर्षभर पगार न मिळाल्यान त्रासून नोकरी सोडली आहे तर मत्स्यविभागाने त्याठिकाणी नविन भरतीसाठी परटवणे येथिल कार्यालयात मुलाखती घेण्याचा धडाका लावला आहे . आधीच्या सागर मित्रांना पगार नाही . त्यात ही नविन भरती करून सरकार काय साध्य करणार आहे ? सरकारची ही योजना राबवण्यासाठी सागर मित्राना पालखीच्या भोई सारखे वापरण्यात येत आहे पगार नसल्याने कंटाळून एकाने नोकरी सोडली की दुसरे गरजू पुढे येत आहेत . सरकारला याचे सोयरसुतक नाही फंड नसताना बेरोजगार तरुणांना मोफत राबवण्याचे काम मत्स्य विभाग करत आहे त्यामुळे सागर मित्रांच्यात नाराजी पसरली आहे
www.konkantoday.com