
शिवसेनेला सोडून भाजपचा झेंडा हाती घेतलेल्या खेडचे शशिकांत चव्हाण परत शिवसेनेत
शिवसेनेला सोडून भाजपचा झेंडा हाती घेतलेल्या खेडचे शशिकांत चव्हाण यांनी पुन्हा हाती शिवबंधन बांधले आहे. महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम यांच्या उपस्थितीत चव्हाण यांनी पुन्हा एकदा शिवसेनेत प्रवेश केला.
शिवसेनेत एकेकाळी ज्येष्ठ शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे शशिकांत चव्हाण मध्यंतरी काही कारणामुळे भाजपात गेले होते. मात्र त्यांनी पुन्हा भाजपला रामराम करत शिवसेनेची वाट धरली. शिवसेना नेते रामदास कदम यांच्या उपस्थितीत शशिकांत चव्हाण स्वगृही परतले.
www.konkantoday.com




