नव्या लूकमधील व विस्टाडोम डब्यासह जनशताब्दी रत्नागिरीत दाखल
कोकण रेल्वे मार्गावर नविन सुरू होणारी गाडी उशिरा धावते ही परंपरा नविन एल एच बी डब्यांच्या जनशताब्दी एक्सप्रेस या गाडीने कायम राखली. रत्नागिरी येथे तब्बल २५ मिनिटे उशिरा आलेल्या या गाडीला प्रवाशांचा प्रतिसाद लाभला नाही. नेहमी खच्चून भरलेल्या या गाडीने जेमतेम ६०% प्रवाशांनी प्रवास केला .
बुधवारी मुंबई पावसाने तुंबवली होती. मध्य रेल्वे वर काही ठिकाणी प्लॅटफॉर्म पर्यंत पाणी भरले होते. गुरूवारी सकाळी मात्र नविन एल एच बी डब्यांच्या जनशताब्दी एक्सप्रेस या गाडीने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ठीक वेळी प्रयाण केले. नंतर कोकण रेल्वे मार्गावर आल्यावर ही गाडी रखडली आणि रत्नागिरी येथे तब्बल २५ मिनिटे उशिरा आली. जुन्या १४ ऐवजी १६डब्यांच्या या गाडीची लांबी जास्त आहे. त्याच प्रमाणे डब्यांची जागा बदलली आहे. नविन रचनेत गोव्याला जाताना इंजिन नंतर 6 दुसरा वर्ग- मधे 3 वातानुकूलित निळे डबे- परत 6 दुसरा वर्ग आणि 16 वा पूर्व रेल्वे चा निळा- पांढरा विस्टाडोम डबा अशी रचना आहे. नविन एल एच बी डब्यांच्या गाडी मुळे प्रवासी क्षमता वाढणार आहे तसेच एक जादा वातानुकूलित डबा मिळणार आहे
www.konkantoday.com