नवी मुंबईतील विमानतळाला हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव

0
33

नवी मुंबईतील विमानतळाला हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात येणार असल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना दिली.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसिध्दी माध्यमांशी संवाद साधला तेव्हा पत्रकारांनी नवी मुंबईतील विमानतळाला नाव देण्याबाबत प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले की, नवी मुंबईतील विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात येईल. तर भविष्यातील दुसऱया मोठय़ा प्रकल्पाला दिवंगत खासदार दि. बा. पाटील यांचे नाव दिले जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संघर्ष समितीला दिले आहे अशी माहितीही यावेळी एकनाथ शिंदे यांनी दिली.
दरम्यान दि बा पाटील यांचेच नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयापासून ते कळवा नाका आणि कळवा नाका इथपासून ते नवी मुंबईपर्यंत गुरुवारी साखळी आंदोलन करण्यात आले हाेते
www.konkantody.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here