कळंबस्ते मलदेवाडीमध्ये संकटकाळी ग्रामस्थांच्या मदतीला धावले मुंबईकर
१५० वाफेचे यंत्र, ऑक्सिमीटर, थर्मामीटर, सॅनिटायझर व मास्क केले घरोघरी वाटप
कोरोना महामारीच्या संकटकाळात समाजाचे काही देणे लागतो याच भावनेतून संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते मलदेवाडी मध्ये मुंबईकरांकडून ग्रामस्थांसाठी १५० वाफेचेयंत्र, ऑक्सिमीटर,थर्मामीटर ,सॅनिटायझर व मास्क इतर साहित्य यांचे वाटप करण्यात आले. कोरोना सारख्या महामारीवर मात करण्यासाठी सर्वात पहिला उपाय म्हणजे गरम पाण्याची वाफ हे लक्षात घेऊन वाफेच्या यंत्र वाटण्याचा निर्णय घेण्यात आला.
कोरोना काळाच्या सुरुवातीला याच ग्रामस्थांनी मुंबईकरांना सर्व नियम पाळून गावात प्रवेश दिला होता. परंतु आज याच ग्रामस्थांवर कोरोनाचे संकट आहे.या संकटाचा सामना करण्यासाठी आपल्या बांधवाना या साथीच्या आजारातून मुक्त करण्यासाठी ग्रामस्थांच्या बाजूने मुंबईकर सुध्दा लागेल ते सहकार्य करण्यासाठी उभा ठाकला आहे.
वाफेचेयंत्र,ऑक्सिमीटर,थर्मामीटर ,सॅनिटायझर मास्क ग्लोज, फेसशिल्ड,PPE किट, इत्यादी साहित्य देण्यात आले.सोबत जनजागृती लक्षात घेता गावामध्ये सूचना फलक लावण्यात आले. ग्रामस्थांनी घाबरून जावू नये,सर्दी ताप खोकला असे मोसमी आजार आहेत, घाबरण्याचे काही कारण नाही.योग्य खबरदारी घेतल्यास,काळजी घेतल्यास तो आजार नक्की बरा होतो.त्यामुळे लोकांनी घाबरून जावू नये.असे आवाहन मुंबईकरांकडून सर्व ग्रामस्थांना केले जात आहे.
www.konkantoday.com