शिकाऊ वाहन चालकांना आता घरबसल्या लर्निंग लायसन्स मिळण्याचा मार्ग मोकळा
शिकाऊ वाहन चालकांना आता घरबसल्या लर्निंग लायसन्स मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परिवहन विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार नवख्या चालकांना फक्त आधार कार्डच्या आधारे घरात बसून ऑनलाईन अर्ज करून परीक्षा देता येणार आहे. याशिवाय नॉन ट्रान्सपोर्ट अर्थात खाजगी प्रवासी वाहनांच्या नोंदणीसाठी प्रादेशिक कार्यालयात (आरटीओ) वाहन घेऊन जाण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे या दोन निर्णयांमुळे वाहन चालक व मालकांना फेसलेस सुविधा उपलब्ध होणार आहे.
परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी संबंधित दोन निर्णयांची घोषणा केली आहे.
www.konkantoday.com