लाॅकडाऊनचा काहीनी घेतला गैरफायदा ,टोमॅटो ऐंशी तर मिरची १२०रुपये किलो

0
24

जिल्हा प्रशासन करोनाचा निर्बंधांखाली अनेक नवनवीन नियमावली जाहीर करीत असते लाॅकडाऊनच्या काळात दूधा शिवाय
भाजीपाला व फळ विक्रीला बंदी होती परंतु प्रशासन केवळ नियम करून बसते त्याची अंमलबजावणी होत नाही त्याचा फायदा घेत काहीजणांनी छोट्या टेम्पोत भाज्या भरून सोसायटीत विक्री केली परंतु ही विक्री करताना भाज्यांचे दर एवढे चढे ठेवले ही भाजी खरेदी करणाऱ्यांचे डोळे पांढरे झाले टोमॅटो ८० रुपये मिरची १२० रुपये या दराने विक्री होत होते त्यामुळे जी भाजी एरवी चाळीस रुपयांत मिळत होती त्यासाठी नागरिकांना चक्क दोनशे रुपये मोजावे लागत होते काहींनी त्याला हरकत घेतली परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही हाेलसेल व्यापाऱ्यांनी प्रचंड दर वाढवल्याने आपल्याला महाग भाजी खरेदी करावी लागल्याने दर वाढवावे लागल्याचे या भाजी विक्रेत्यांचे म्हणणे होते कोरोनाच्या निर्बंधांमुळे अनेकांचे व्यवसाय धंदे बंद आहेत त्यामुळे अनेक कुटूंबे आर्थिक डबघाईला आली असतानाच या अशा परिस्थितीलाही नागरिकांना तोंड द्यावे लागल आहे सध्या हा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होतोय
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here