मुंबई गोवा महामार्गावर संगमेश्वर नजिकच्या शिंदे आंबेरी येथे तुमसर येथे मधमाशांच्या हल्ल्यात चार जण जखमी

0
16

मुंबई गोवा महामार्गावर संगमेश्वर नजिकच्या शिंदे आंबेरी येथे तुमसर मधमाश्यांच्या हल्ल्यात प्राथमिक आरोग्य केंद्रातील दोन कर्मचाऱ्यांसहित एकूण चौघे जखमी झाले आहेत. या चौघांनाही उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.
संगमेश्वर तालुक्यातील महामार्गावरील शिंदे आंबेरी येथे साफसफाईचे कामं सुरू असताना ‘तुमसर’ जातीच्या मधमाश्यांच्या पोळ्याला चूकून हाताचा स्पर्श झाला आणि पोळ्यातून माश्या उठल्याने लोकांनी तिथून पळ काढला. त्याचं वेळी रविंद्र खसासे व दामू खसासे यांच्यावर मधमाश्यांनी हल्ला केला त्यात ते जखमी झाले. याच दरम्यान या मार्गाने दुचाकीवरून तुरळकडे लसीकरणासाठी जाणारे आरोग्य केंद्रातील कर्मचारी विश्वनाथ जाधव आणि रेखा भुवड यांच्यावर देखील मधमाश्यांनी हल्ला चढवला त्यात ते जखमी झाले
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here