जगबुडी नदीपात्रात अवैध वाळू उत्खनन, महसुल विभागाचे दुर्लक्ष

खेड ; पर्यावरणाच्या कारणास्तव तालुक्यात उत्खननालाबंदीअसतानाही तालुक्यातील आंबवली,सुकीवली परिसरात जगबुडी नदीपात्रात शेकडो ब्रास वाळूचे उत्खनन करण्यात आले. विशेष म्हणजे अनधिकृतपणे वाळू उत्खनन करणाऱ्यांना ग्रामस्थांनी रंगेहाथ पडकडून महसुल विभागाच्या ताब्यात दिले मात्रमहसूलकडूनकोणतीहीकारवाई केलीजातनसल्यानेजगबुडी नदीपात्रातील वाळूचे उत्खनन महसूल विभागाच्या परवानगीनेच होत आहे कीकाय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पर्यावरणाचा होणारा हास टाळण्यासाठी गाडगीळ समितीच्या शिफारशीनुसारखेडतालुक्यातकोणत्याही प्रकारचे उत्खनन करण्यास बंदी आहे. मात्र तालुक्यातील आंबवली व सुकीवलीपरिसरातून वाहणाऱ्या जगबुडी नदीपात्रात अनधिकृतपणे शेकडो ब्रास वाळू काढली जात आहे. सुकीवली येथेकोंढण्यात येणारी वाळू ही याच परिसरात नव्याने उभ्या रहात असलेल्या एका कारखान्याच्या इमारतीचे पिंचींगकरण्यासाठी वापरली जात आहे. सुकीवली ग्रामपंचायतीच्या हद्दीत उमा इंडस्ट्रिज नावाची पाण्याच्या टाक्या बनवणारी
कंपनी उभी रहात आहे. ही कंपनी भरणे येथील एका व्यावसायिकाच्या मालकीची आहे. हा व्यवसाकि कंपनीच्या इमारतीचे पिंचीग करण्यासाठी जगबुडी नदीतील वाळू आणि दगड-गोटे वापरतआहे.रात्रीच्या काळोखाचा फायदा घेत नदीपात्रात शेकडो ब्रास वाळू काढली जात आहे.ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर
ग्रामस्थांनी पाळत करून रात्रीच्या काळोखात अवैध वाळूची वाहतुक करणाऱ्या टॅक्टर पकडून महसुल
विभागाच्याताब्यात दिला.
महसूल विभागाकडून वाळू उत्खनन करणाऱ्यावर कारवाई केली जाईल अशी ग्रामस्थांची अपेक्षा होती. मात्र महसूलविभागाकडून कोणतीच कारवाई न झाल्याने ग्रामस्थांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे. वाळू चोरी करणाऱ्याला रंगेहाथपकडून देवूनही महसूलचे स्थानिक अधिकारी कारवाई करणार नसतील तर वाळू चोरांना रोखणार कोण? हा सवालग्रामस्थांना पडला आहे. खासगी कारखान्याची इमारत उभारण्यासाठी नदीपात्रातील वाळूची चोरी करणे हा गुन्हाअसल्याने उत्खनन करणाऱ्या विरोधात ग्रामस्थ जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे समजते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button