
यापुढे लाॅकडाऊन स्वीकारणार नाही चिपळूणमधील व्यापार्यांचा इशारा,बाजारपेठा सुरू करण्याबाबत आमदार शेखर निकम यांची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी
जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेले लाॅकडाऊन संपल्यानंतर १० तारखेनंतर बाजारपेठा सुरू कराव्यात अशी मागणी चिपळूण येथील व्यापारी महासंघटनेने केली आहे यापुढे आम्ही लॉक डाऊन स्वीकारणार नाही निर्बंध घालून आम्हाला बाजारपेठा उघडण्याची परवानगी द्यावी जशी मागणी चिपळूण येथील व्यापारी महासंघटनेने केली आहे आम्ही आतापर्यंत प्रामाणिकपणे शासनाला मदत केली आहे तसेच यापुढे करत राहू पण लॉकडाऊन स्वीकारणार नाही याबाबतचे निवेदन व्यापारी महासंघटनेने जिल्हाधिकारी व आमदार शेखर निकम यांना दिले आहे आमदार शेखर निकम यांनी त्याची तातडीने दखल घेऊन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री व पालकमंत्री यांना पत्र देऊन जिल्ह्यातील बाजारपेठा सुरू करण्याची मागणी केली आहे याबाबत आमदार शेखर निकम यांनी व्यापाऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल संघटनेचे अध्यक्ष शिरीष काटकर यांनी त्यांना धन्यवाद दिले आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील व्यापारी यापुढे लाॅकडाऊन विरोधात असून निर्बंध व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी असून सर्वत्र मागणी होत आहे
www.konkantoday.com