चिपळूण नगरपालिकेच्या सहकार्याने अद्ययावत ५५ बेडचे कोविड केअर सेंटर १८ जूनपूर्वी चिपळूणवासीयांच्या सेवेत रुजू होणार

चिपळूण नगर परिषदेच्या सहकार्याने कै. अण्णासाहेब खेडेकर क्रीडा संकुलात अपरांत हॉस्पिटलतर्फे उभारण्यात येत असलेले अद्ययावत ५५ बेडचे कोविड केअर सेंटर १८ जूनपूर्वी चिपळूणवासीयांच्या सेवेत रुजू होणार असल्याची माहिती नगर परिषदेचे आरोग्य समिती सभापती शशिकांत मोदी यांनी दिली.
उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे यांच्यासह अन्य नगरसेवकांनी शनिवारी या कोविड केअर सेंटरची पाहणी करत अपरांत हॉस्पिटलचे डॉ. यतीन जाधव यांच्याकडून या सेंटर संदर्भातील माहिती जाणून घेतली आणि काही सूचना केल्या. या सूचनांची अंमलबजावणी केली जाईल, अशी ग्वाही डॉ. जाधव यांनी यावेळी दिली.
www.konkatoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button