
रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील कोरोना चाचणीचे अहवाल विलंब प्रकरणी जिल्हाधिकार्यां कडून दखल
रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील कोरोनाचा चाचणीचे अहवाल देखील तीन-चार दिवस नव्हे तर चक्क ८दिवसांनी मिळाले तोपर्यंत चाचणी घेणारे बाहेर फिरत होते अहवालआल्या नंतर त्यातील१७९ जणपॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली होती आता या प्रकरणात जिल्हाधिकारी यांनी लक्ष घातले असून दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत मंडणगड तालुक्या तील अनेक नागरिकांचे स्वॅब २५ ते २९ मेरोजी घेण्यात आले होते. दोन किंवा तीन दिवसात चाचणीअहवाल येणे अपेक्षित हाेतेमात्र २ जूनला हे अहवाल आले. याआठ दिवसामध्ये संबंधित लोक निर्धास्त फिरत होते. त्यांच्यावरआरोग्य विभागाची किंवा ग्राम कृतिदलाचे कोणतेही नियंत्रण नव्हते. धक्कादायक म्हणजे १७९ जणांचे अहवाल २ जूनलापॉझिटिव्ह आले. अजूनही शंभर जणांचे अहवाल मिळाले नसल्याने जिल्हा प्रशासनाने यात लक्ष घालून कारवाईचे आदेश दिले आहेत
www.konkantoday.com