राज्यातल्या लॉकडाउनचे निर्बंध हळूहळू कमी करण्यात येणार ,रत्नागिरी व सिंधुदुर्ग तिसऱ्या टप्प्यात

राज्यातल्या करोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने आता लॉकडाउनचे निर्बंध हळूहळू कमी करण्यात येत असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. आज झालेल्या पत्रकारपरिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातल्या बारावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णयही जाहीर केला.
यावेळी माध्यमांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, राज्यातला लॉकडाउन टप्प्याटप्प्याने हटवण्यात येणार आहे. त्यासाठी रुग्ण बाधित आढळण्याचं प्रमाण ५ टक्क्यांहून कमी असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये सर्वकाही सुरळीत सुरु होणार आहे. मात्र, इतर जिल्ह्यांमध्ये अंशतः अनलॉक करण्यात येईल.

या नव्या नियमांची अंमलबजावणी उद्यापासून करण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्यातले जिल्हेः

ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ, औरंगाबाद, भंडारा, बुलडाणा, धुळे, गोंदिया, लातूर, नागपूर, नांदेड, चंद्रपूर, नाशिक, परभणी, गडचिरोली, जालना, जळगाव

काय सुरु होणार?

रेस्टॉरंट्स, मॉल्स
मैदानं, वॉकिंग ट्रॅक्स
खासगी आणि सरकारी कार्यालयं 100 टक्के सुरु
सार्वजनिक कार्यक्रम, लग्न सोहळ्यांना परवानगी
जीम, सलून
आंतरजिल्हा प्रवास
ई-कॉमर्स सुविधा
दुसऱ्या टप्प्यातले जिल्हेः

मुंबई, मुंबई उपनगर, नंदुरबार, अहमदनगर अमरावती, हिंगोली

काय सुरु होणार?

५० टक्के क्षमतेने रेस्टॉरंट्स
५० टक्के क्षमतेने म़ॉल्स, थिएटर्स
सार्वजनिक जागा, मैदानं वॉकिंग ट्रॅक पूर्णपणे सुरु
बांधकामं, कृषीविषयक कामं पूर्णपणे सुरु
जीम, सलून ५० टक्के क्षमतेने सुरु
बसेस पूर्ण क्षमतेने सुरु
जिल्ह्याबाहेर जायला परवानगी, मात्र पाचव्या टप्प्यातल्या जिल्ह्यात जायचं असेल तर पास काढावा लागणार.
तिसऱ्या टप्प्यातले जिल्हेः

अकोला, बीड, कोल्हापूर, उस्मानाबाद, पालघर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर.

काय सुरु राहणार?

अत्यावश्यक सेवेतली दुकानं सकाळी ७ ते २
इतर दुकानं सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते २ (शनिवार, रविवार बंद)
चौथ्या टप्प्यातले जिल्हेः

पुणे, रायगड

चौथ्या टप्प्यातल्या जिल्ह्यांसाठीचे निर्बंध कायम राहतील.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button