मुंबई गोवा महामार्गात राजापूर शहरानजीक कोंढेतड-उन्हाळे हद्दीवर बांधण्यात माती दगडाची सरंक्षण भिंत अवकाळी पावसातच कोसळली
मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाच्या दर्जाबाबत अनेक ठिकाणी प्रश्न उपस्थित होत असतानाच
मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदीरकण करणाऱ्या केसीसी बिल्डकॉन कंपनीकडून राजापूर शहरानजीक कोंढेतड-उन्हाळे हद्दीवर बांधण्यात माती दगडाची सरंक्षण भिंत अवकाळी पावसातच कोसळली आहे. महामार्गाच्या मजबुतीकरणासाठी घालण्यात आलेली ही भिंत सुमारे ५०० फूट दरीत कोसळली असून कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
केसीसी बिल्डकॉन कंपनीकडून महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी महामार्गाचे रूंदीकरण, उंचीकरण व महामार्गाला संरक्षण भिंत बांधण्याचे काम सुरू आहे.
www.konkantoday.com