
जागतिक आरोग्य संघटनेनं भारतात आढळून आलेल्या कराेना स्ट्रेनचे डेल्टा आणि कप्पा असे नामकरण केले
जगभरात करोनाचे वेगवेगळे स्ट्रेन निर्माण झाले आहे. करोनाच्या विषाणूमध्ये बदल झाल्याने हे स्ट्रेन निर्माण झाले असून, त्याच्या नावांवरून गोंधळ निर्माण झाला असून, वादही होताना दिसत आहे. या सगळ्या गोंधळावर जागतिक आरोग्य संघटनेनं मार्ग काढला असून, विविध देशात आढळून आलेल्या करोना स्ट्रेनचं नामकरण केलं आहे. या स्ट्रेनला नाव देताना ग्रीक वर्णमालेचा आधार घेण्यात आलेला आहे. त्यामुळे भारतात आढळून आलेल्या दोन स्ट्रेन डेल्टा आणि कप्पा अशी नावं देण्यात आली आहेत.
www.konkantoday.com