कोरोना ची वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हाबंदी लागू करण्यात आली
कोरोना ची वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हाबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्ह्याच्या खारेपाटण, करूळ, आंबोली, बांदा या भागांतील सीमा अत्यावश्यक सेवा वगळता परजिल्ह्यातील किंवा परराज्यातील व्यक्तींना वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्या आहेत. 1 जून ते 15 जून पर्यंत जिल्हाबंदीचे हे नियम इथं लागू असणार आहेत.
असं असलं तरीही कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू, वैद्यकीय कारणं, अत्यावश्यक / जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक या कारणांसाठी प्रवास करण्याची सूट या नियमांतून देण्यात आली आहे. जिल्ह्याधिकाऱ्यांनीच यासंदर्भातीच आदेश काढले असून, या नियमांतून कार्गो वाहतुकीद्वारे दुकानं/ आस्थापनांच्या वस्तुंच्या वाहतुकीला या निर्बंधांतून वगळण्यात आलं आहे.
www.konkantoday.com