कोरोना मुक्त गाव आणि कोरोनामुक्त शहराची मुख्यमंत्र्यांची नवी संकल्पना
कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी आपण काराेनामुक्त गावाचा संकल्प करुन देशासमोर उत्तम उदाहरण घालून देऊया, असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. मुख्यमंत्र्यांनी रविवारी सोशल मीडियाद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला
आपण राज्यात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’, ‘मी जबाबदार’, अशी वेगवेगळी अभियानं यशस्वीरित्या राबवली. आता शहर आणि गावांनी ठरवलं तर आपण कोरोना मुक्त गाव आणि कोरोनामुक्त शहराची संकल्पना यशस्वीरित्या राबवू शकूप्रत्येक घर, प्रत्येक गाव, प्रत्येक शहर कोरोनामुक्त झालं तर राज्य कोरोनामुक्त होईल, असं मुख्यमंत्री म्हणाले
www.konkantoday.com