रत्नागिरी जिल्ह्यात आठ दिवस टाळेबंदी अटळ?
गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचेरुग्णवाढतअसल्या मुळे जिल्ह्यात कडकटाळेबंदी करण्या संदर्भात प्रशासन सकारात्मक आहे. यासंदर्भातशुक्रवारी आढावा घेतला. त्यामुळे आठ दिवस टाळेबंदीबाबत
पालकमंत्री अँड. अनिल परब यांच्याशी चर्चा करुनमुख्यमंत्र्यांकडे ही बाब मांडणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.कोरोनासंदर्भातीलपरिस्थितीबाबत रत्नागिरीतजिल्हाधिकारी, जिल्हा पोलिसअधिक्षक,मुख्यकार्यकारीअधिकारी , जिल्हा परिषदअध्यक्षयांच्यासह आरोग्यअधिकाऱ्यांची बैठक झाली. कोरोनाबाधित बरे होण्याचे टक्केवरुन ८६.९७ टक्केवर पोचले आहे. ही जिल्ह्यासाठीसमाधानकारक बाब आहे. मात्र मृत्यूदर ३.३१ टक्के झाला आहे. हीगोष्ट चिंताजनक आहे. या परिस्थितीवर नियंत्रण करण्यासाठी
कडक लॉकडाऊन हा एकमेव पर्याय आहे, असे सर्वचअधिकाऱ्यांनी सुचित केले आहे. हा पर्याय अवलंबण्याबाबत
मंत्रीस्तरावरचर्चाकेलीजाईल.पालकमत्री अँड. परब यांच्याशीचर्चा करुन लॉकडाऊनसाठी मुख्यमंत्र्यांपुढे प्रस्ताव सादर केलाजाईल. त्यांनी परवानगी दिल्यानंतर रत्नागिरीतील व्यापारीवर्गाशी चर्चा केली जाईल. सर्वाना विश्वासात घेऊन त्यानंतरयाची अंमलबजावणी केव्हा करायची यावर निर्णय घेतलाजाईल. लॉकडाऊनची घोषणा करण्यापुर्वी केंद्र शासनाच्या
निकषानुसार नागरिकांना ४८तास आधी कळवण्यात येईल.जेणेकरून नागरिकांची गैरसोय होणार नाही. याची काळजी घेतलीजाईल
www.konkantoday.com