
नवी मुंबईतील जलवाहतुकीचा मार्ग अखेर मोकळा
नवी मुंबईतील जलवाहतुकीचा मार्ग अखेर मोकळा होणार आहे. गेल्या ५ वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पाला केंद्राच्या पर्यावरण विभागानं परवानगी दिली आहे. त्यामुळे आता लवकरच या प्रकल्पाचा भूमिपुजन सोहळा पार पडेल, सिबीडी बेलापूर येथे मरिना सेंटर उभारण्यात येणार आहे अशी माहिती भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रकल्पामुळे नवी मुंबईच्या पर्यटनाला चालना मिळेल. सोबच सिडकोच्या माध्यमातून १५ कोटी रुपयांचा खर्च करुन हा प्रकल्प उभारण्यात येईल.
लवकरच नवी मुंबई तून मांडवा, भाऊचा धक्का, एलिफंटा ही जलवाहतूक सुरु होईल.
www.konkantoday.com