
तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने पूर्वतयारी म्हणून बंद असलेली जम्बो करोना रुग्णालये पुन्हा सुरू करण्याचा निर्णय jumbo covid centres
निर्बंध शिथिल केल्यानंतर आगामी काळात रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन वांद्रे-कुर्ला संकुल, मुलुंड आणि दहिसर करोना केंद्रे १२ ऑगस्टपासून पुन्हा कार्यान्वित करण्याचे आदेश पालिकेने दिले आहेत.
गेल्या काही दिवसांमध्ये केरळ, तमिळनाडू, कर्नाटकातील काही जिल्ह्य़ांमधील रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत आहे. तसेच युरोप, अमेरिकेतही सध्या तिसरी लाट सुरू आहे. सध्या मुंबईसह राज्यातील काही जिल्ह्य़ांमधील निर्बंध शिथिल केल्यामुळे रुग्णसंख्या वाढण्याचा धोका आहे, तेव्हा तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने पूर्वतयारी म्हणून बंद असलेली जम्बो करोना रुग्णालये पुन्हा सुरू करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे
www.konkantoday.com




