
एअर इंडियाच्या सर्व्हरवर सायबर हल्ला,४५ लाख लोकांची माहिती लीक
हवाई वाहतूक क्षेत्रातील सार्वजनिक विमानसेवा कंपनी एअर इंडियाच्या सर्व्हरवर सायबर हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. फेब्रुवारी २०२१च्या शेवटच्या आठवड्यात हा हल्ला करण्यात आला असून, ऑगस्ट २०११ ते ३ फेब्रवारी २०२१ या कालावधीतील ४५ लाख लोकांची माहिती लीक झाली असल्याचं एअर इंडियानं म्हटलं आहे. या माहितीत प्रवाशांच्या नावासह जन्म तारीख, संपर्क क्रमांक, पासपोर्टवरील माहिती, क्रेडिट कार्डची माहिती यासह इतर माहिती चोरली गेली आहे.
www.konkantoday.com