तौक्ते चक्रीवादळामुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या मालमत्तांचे अंदाजे १ कोटी ९५ लाख ८४ हजार रुपयांचे नुकसान
तौक्ते चक्रीवादळामुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या मालमत्तांचे अंदाजे १ कोटी ९५ लाख ८४ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती अध्यक्ष विक्रांत जाधव दिली.
तौक्ते चक्रीवादळाने जिल्ह्यात धुमाकूळ घातला होता. या वादळामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या अनेक मालमत्तांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये रत्नागिरी व चिपळूण बांधकाम विभागाचे एका रस्त्याचे ८ लाख ३० हजार रुपये, साकवाचे ३५ लाखांचे, खेड तालुक्यातील ४ विहिरी नादुरुस्त झाल्याने ३५ लाख १५ हजारांचे, २०० शाळा, वर्गखोल्यांचे ८७ लाख ७७ हजार रुपयांचे नुकसान झाले. त्याचबरोबर २७ अंगणवाड्यांच्या इमारतीचे पत्रे उडाल्याने ६ लाख ६९ हजार रुपये, ६ ग्रामपंचायतींच्या इमारतींची पडझड झाल्याने ६ लाख ३० हजारांचे, जिल्ह्यातील १५ प्राथमिक आरोग्य केंद्रे व कर्मचाऱ्यांच्या निवास्थांनाचे सुमारे १२ लाख ३५ हजार रुपयांचा, तसेच तीन उपकेंद्रांच्या इमारतींचे २३ हजार रुपयांचे नुकसान झाले, असेही जाधव यांनी सांगितले.
www.konkantoday.com