रत्नागिरी शहरातील ऐंशी फुटी रस्ते झाले नगरपरिषदेच्या कृपेने दहा फुटी
एकेकाळी रत्नागिरी शहरातील मुख्य असलेल्या ऐंशी फुटी रस्ता आता दिवसेंदिवस नगरपरिषदेच्या कृपेने आकसत चालला आहे रत्नागिरी शहरातील नळपाणी योजनेसाठी अर्धा रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे पाईपलाईन घालून झाल्यानंतर रस्ते पूर्ववत करण्याचे काम अद्यापही बाकी आहे अनेकवेळा हा भाग परत परत कामासाठी खोदला जात आहे काही ठिकाणी मातीचे ढिगारे आहेत त्यामुळे या परिसरातील दुकानात किंवा रुग्णालयात किंवा बँकेत जाण्यासाठी आलेल्या ग्राहकांना गाड्या बाहेर रस्त्यावर उभ्या करून ठेवाव्या लागत आहेत लोटलीकर हॉस्पिटलपासून आरोग्य मंदिरच्या परिसरातील हा ऐंशी फुटी रस्ता सध्या वाहतुकीसाठी दोन्ही बाजूनी दहा दहा फुटी शिल्लक राहिला आहे त्यामुळे अनेक वाहनांना मोठी कसरत करत या भागातून वाहने हाकावी लागत आहेत शहरातील अनेक भागात असेच दृश्य असून याच मार्गावरून नगरपरिषदचे सन्माननीय अध्यक्षांसह अनेक नगरसेवक जात येत असले तरी या परिस्थितीत कोणताही बदल होत नसल्याने रत्नागिरीतील सहनशील नागरिक मुकाटपणे हे सहन करीत आहे.
www.konkantoday.com