कोठेही गाजावाजा न करता अनुबंध,दापोलीचे संकटात मदतकार्य सुरु ,ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटरची सुविधा
कोरोना काळात किट वाटणे असो किंवा निसर्ग वादळा नंतर दोन्ही संकटात मदतकार्य किंवा झाडे,साधन सामुग्री वाटप याचे कोठेही गाजावाजा न करता अनुबंध,दापोली आपले काम करत राहिली.नुसते सांस्कृतिक कार्यक्रम करणे एवढेच उद्दिष्ट न ठेवता आपत्ती व्यवस्थापनासाठी अनुबंध आपत्कालीन सेवा उपक्रम सुरू केला त्यासाठी अनेक सुहृदांनी सुद्धा त्याला वस्तू व पैश्याच्या स्वरूपात सढळ हस्ते मदत केली.
कोरोना रुग्णांसाठी ज्यांना 5 लिटर/मिनिट क्षमतेने बाह्य ऑक्सिजन लागतो त्यांच्यासाठी ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर ची सोय करीत आहोत.सदर कॉन्स्ट्रेटर अत्यल्प ₹५००.००भाडे प्रति दिवस आणि ₹ १००००.०० अनामत रक्कम भरून सदर सेवा उपलब्ध करून देत आहोत.
संपर्क-प्रसाद फाटक ९९२३००८१२३
www.konkantoday.com