रत्नागिरी तालुक्यातील खालगाव जाकादेवी बाजारपेठेमध्ये लॉकडाऊनचा निर्णय

0
36

रत्नागिरी तालुक्यातील खालगाव जाकादेवी बाजारपेठेमध्ये कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने खालगाव ग्रामपंचायत आणि व्यापारी संघटना यांची मंगळवारी बैठक घेतली. या बैठकीत कडक लॉकडाऊनचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. गुरुवार, दिनांक १३ मे ते सोमवार दिनांक १७ मे या पाच दिवसीय कालावधीत वैद्यकीय सेवा वगळून बाजारपेठेतील इतर सर्व दुकाने सलग पाच दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बंद कालावधीत जर कोणी दुकाने उघडली तर ग्रामपंचायत खालगाव यांच्यावतीने अशा दुकानांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा सर्वानुमते ठराव बैठकीत घेण्यात आला
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here