कामथे उपजिल्हा रुग्णालयातील एका डॉक्टर मारहाणप्रकरणी कोठडीत असलेल्या महिलांपैकी एक महिला पॉझिटिव्ह

कामथे उपजिल्हा रुग्णालयातील एका डॉक्टर मारहाणप्रकरणी दोन महिलांना ताब्यात घेत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. त्यातील एका महिलेला कोरोनाची बाधा झाली असून, तिला रत्नागिरीतील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याबाबत न्यायालयाने सूचना केल्या आहेत.
याप्रकरणी येथील पोलिसांनी अटक केलेल्या दोन्ही महिलांची पोलीस कोठडी गुरुवारी संपल्यावर त्यांना पुन्हा न्यायालयासमोर हजर केले. त्यावेळी न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या दोघींनाही रत्नागिरी जिल्हा विशेष कारागृहात पाठविण्यात आले होते. महिला न्यायाधीन बंदी कारागृहात दाखल करण्यापूर्वी कोरोना आरटीपीसीआर चाचणी करणे आवश्यक असल्याने तिची कोरोनाची चाचणी करण्यात आली हाेती.त्याचा अहवाल दि. १० मे राेजी प्राप्त झाला. त्यामध्ये एक महिला पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल या कारागृहास प्राप्त झाला
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button