शासकीय रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांशी उद्धट गैरवर्तन करणाऱ्यांना प्रसंगी जशास तसे उत्तर दिले जाईल समविचारी मंचचा इशारा

रत्नागिरीः आरोग्य व्यवस्थेत जी काही ढिलाई दिसून येत आहे त्यांला शासकीय प्रशासन कारणीभूत आहे.आँक्सिजन तसेच व्हेंटीलेशन बेडची उपलब्धता नसणे,याला तेथील आरोग्य कर्मचारी कारणीभूत नसून या अव्यवस्थेला सबंधित प्रशासन जबाबदार आहे हे सर्वप्रथम लक्षात घेऊन मगच आरोग्य कर्मचाऱ्यांशी हुल्लडबाजी करावी.प्रशासनाच्या चूकांचे खापर तेथील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर काढून त्यांच्याशी वादविवाद करणे योग्य नाही परिस्थितीचे भान न राखता जर तेथील कर्मचाऱ्यांना दमदाटी वा हुल्लडबाजी कोणी करत असेल तर वेळ आल्यास जशास तसे उत्तर द्यावे लागेल असा इशारा समविचारी मंचने दिला आहे.
याबाबतीत माहिती घेता आवश्यक साधने नसतांना कमी वेतनावर जीव धोक्यात घालून अनेक कोविड कर्मचारी निष्ठेने आपली सेवा बजावत आहेत.रुग्णालयांतील साधनसामग्रीची कमतरता विचारात न घेता रुग्णांचे काही नातेवाईक झुंडीने येऊन वाद करतात.दमदाटी करतात अशा तक्रारी येत आहेत या तक्रारीची दखल महाराष्ट्र समविचारी मंचने घेतली असून सर्वस्वी समविचारीचे प्रमुख बाबा ढोल्ये,राज्य सरचिठणीस संजय पुनसकर,महासचिव श्रीनिवास दळवी,जिल्हाध्यक्ष रघुनंदन भडेकर,युवाध्यक्ष निलेश आखाडे,तालुकाध्यक्ष आनंद विलणकर,महिला तालुकाध्यक्ष साधना भावे, तालूका संघटक सुप्रिया संजय सुर्वे आदींनी हा निर्वाणीचा इशारा दिला आहे.
बेड्स आणि आँक्सिजन सलग उपलब्ध होत नाहीत.उपचार घेत असलेल्या रुग्णाला हलवता येत नाही.सर्व वस्तुस्थिती प्रत्यक्ष दाखवूनही रुग्णांचे नातेवाईक व इतर सबंधित समजून घेत नाहीत. रुग्ण आणताच क्षणी त्वरित दाखल करण्याची मागणी त्यांच्या नातेवाईकांची असते.एकीकडे बेड्स नाही तर दुसरीकडे अपुरे कर्मचारी यातून जाणारा वेळ कळीचा मुद्दा ठरतो आणि ड्युटीवरील कर्मचाऱ्यांना दम देऊन वादावादीचे प्रसंग ओढवत असल्याने अनेक कर्मचाऱ्यांनी समविचारीकडे धाव घेऊन कैफियत मांडल्याने समविचारीने हा इशारा दिला आहे.
संचारबंदीसह कायदा सुव्यवस्थेचे पालन करणे याक्षणी महत्त्वाचे आहे.त्याचा विसर पडून जर उपकार कर्त्यांवरच दमदाटीचे प्रकार होत असतील तर जशास तसे उत्तर दिले जाईल असेही समविचारीने म्हटले आहे.ही वेळ नाजूक आहे.आरोग्य विभागाला सहकार्याची गरज आहे.सर्वांनी सामजस्य राखून या कठीण परिस्थितीला सामोरे जायला हवे आरोग्य कर्मचाऱ्यांचे मनोध्येय जपण्याची जबाबदारी सर्वांची आहे याचे तारतम्य सर्वांनी राखावे असेही समविचारीने म्हटले आहे.याबाबत शासकीय कामात अडथळा त्यासाठी शिक्षा दंड या जागृतीचे फलक दर्शनी भागात लावावे अशी मागणी समविचारीने केली आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button