सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी खासदार नारायण राणेंचे केले कौतुक

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज ऑनलाईन झालेल्या पत्रकार परिषदेत ४५वर्ष लसिकरणाच्या मुद्यावरून माजी आमदार बाळ माने यांच्यावर जोरदार टीका केली असतानाच सिंधुदुर्गात उद्यापासून कडक लॉकदाऊनचा निर्णय जाहीर
करताना भाजप नेते खासदार नारायण राणे यांनी घेतलेल्या भूमिकेचे मात्र त्यांनी कौतुक केले आहे आपण या निर्णयाबाबत नारायण राणे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून सामंत यांना तुम्ही पालकमंत्री म्हणून घेतलेल्या निर्णय आपल्याला मान्य असल्याचे सांगितले यामुळे सांमत यांनी नारायण राणे यांच्या भूमिकेचे कौतुक करताना कसा नेता असावा याचे उदाहरण देताना माजी आमदार बाळ माने यांना टोला मारला नुसते स्वत:ला नेते म्हणून घेणे उपयोगी नाही तर तसे गुण असावे लागतात असा टोला मारला
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button