काजू बी तारण याेजनेला जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद

0
32

कोरोनामुळे रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीकडे शेतकऱ्यांकडील ८२ टन काजू बी तारण ठेवण्यात आली आहे. शिवाय शेतमाल तारण योजनेंतर्गत ७० लाखांच्या कर्जाचे वाटप करण्यात आले आहे.
शेतमाल साठवणुकीच्या सुविधा उपलब्ध नसल्यामुळे ऐन हंगामात शेतमाल एकाच वेळी बाजारात विक्रीसाठी आला तर दर गडगडतात. बाजारभाव कमी प्राप्त झाल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडते. त्यामुळे दर कमी असताना विक्री न करता, शेतमालाची साठवणूक करून तो काही कालावधीनंतर बाजारपेठेत विक्रीला आणल्यास जादा बाजारभाव मिळू शकतो. शेतकऱ्यांना आर्थिक साहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी पणन मंडळाने बाजार समितीतर्फे शेतमाल तारण कर्ज योजना राबविण्याचा निर्णय घेतला असून, काजू बी तारणाला जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद लाभत आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here