रत्नागिरी जिल्ह्यातील रेएमडीसीविर इंजेक्शनची हॉस्पिटल मध्ये किती वाटप झाले याबाबतची माहिती मिळावी-भाजपाचे युवा मोर्चा अध्यक्ष अनिकेत पटवर्धन

0
26

रत्नागिरी जिल्ह्यातील एमडीसीविर इंजेक्शनची हॉस्पिटल मध्ये किती वाटप झाले याबाबतची माहिती मिळवण्यासाठीचे लेखी पत्र भाजपाचे युवा मोर्चाचे अध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे .

रत्नागिरी जिल्ह्यातील रुग्णांकरिता लागणार एमडीसीविर इंजेक्शन त्या डॉक्टरांकडून दिलेल्या माहिती पत्रक शासनाने दिलेल्या माहितीपत्रकात भरून आपल्याकडे पाठविले जाते.
दर दिवशी आपल्या कार्यालयातून कोणत्या हॉस्पिटल ला किती इंजेक्शन आपल्याकडून मान्यता मिळाली. व पुरवठा झाला याचा चार्ट अथवा माहिती पत्र आपल्या कार्यालयामार्फत अथवा जिल्हा माहिती अधिकारी यांच्या मार्फत पत्रकार , तसेच सर्वसामान्य लोकांसाठी माहिती मिळण्यास खूप मोठी मदत होणार आहे.
तरी माझी आपणास विनंती आहे की सदर चा विषय अत्यंत महत्त्वाचा असून आपण आपल्या प्रशासनाला योग्य त्या सूचना करून सदरची माहिती उपलब्ध होण्यासाठी विनंती करत असल्याचे अनिकेत पटवर्धन यांनी पत्रात म्हटले आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here