जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.मोहितकुमार गर्ग यांच्या नावाने फेसबुकवर फेक अकाउंट

0
25

रत्नागिरीचे जिल्हाधिकारी यांच्या बदलीचा बनावट जीआर काढल्याप्रकरणी पोलीस तपास सुरू असतानाच आता रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेला सायबर फसवणुकी जागृती करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवणारे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.मोहितकुमार गर्ग यांच्याच नावाने फेसबुकवर फेक अकाउंट उघडल्यात आल्याचे उघड झाले आहे रत्नागिरी जिल्ह्यात यापूर्वी काही नागरीकांच्या बाबतीत हा प्रकार घडला होता
फेक अकाउंटद्वारे लोकांना फसविण्याचे काम सायबर गुन्हेगार करीत असतात पण आता खुद्द जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. गर्ग . यांच्या नावाने कोणीतरी अज्ञातांने फेक फेसबुक अकाऊंट उघडल्याचे साेमवारी उघड झाले आहे.या नावाने जर रिक्वेस्ट आली तरी कोणीही स्वीकारू नये, असेआवाहन डॉ. गर्ग यांनी केले आहे. नागरिकांनी सोशलमीडियाचा वापर करताना जपून करावा व काही गैरप्रकारआढळला तर रत्नागिरी सायबर सेलच्या ८८८८९०५०२२ या
क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here