जिल्हाधिकारी यांच्या बदलीच्या खोटा जीआर काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल, एक संशयित ताब्यात
रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या बदलीचा खोटा जीआर काढल्याप्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिसांनी वेगाने तपास सुरू करून या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे त्याची कसून चौकशी केली जात आहे. रत्नागिरीच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे.
रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची बदली झाल्याचे एक जीआर रविवारी सोशल मीडियावर फिरत होते. याबाबत स्वतः जिल्हाधिकारी मिश्रा यांनी खुलासा केला होता आपली बदली झालेली नसल्याचे जिल्हाधिकारी मिश्रा यांनी सांगितले हाेते. रत्नागिरीतून कोरोना जात नाही तोपर्यंत मी रत्नागिरीसाठी लढत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांचे बरोबर सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांचीही बदली झाल्याचे या बनावट जीआरमध्ये म्हटले होते अधिक चौकशी केली असता जीआर वर सह्या दाखवलेले अधिकारी सध्या त्या पदावर नसल्याचेही स्पष्ट झाले होते तसेच मूळ जुन्या जीआरमध्ये छेडछाड झाली असल्याचे दिसत होते
त्यामुळे अशा बनावट जीआर काढण्यामागे कोणता हेतू आहे हे लवकरच स्पष्ट होणार आहे
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने २४ तासात एका संशयिताला ताब्यात घेतले आहे . या सर्व प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी माजी आमदार डॉ विनय नातू यांनीदेखील काल केली होती त्यामुळे बनावट जीआर प्रकरण आता पुढे कोणते वळण घेणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे
www.konkantoday.com