
मुंबई शहरात ७५ टक्क्यांपर्यंत लसीकरण झाले, तर १ जूनपर्यंत कोविड मृत्यू दर आटोक्यात येण्याची शक्यता
मुंबईत करोनाच्या दुसऱ्या लाटेत अभ्यासानुसार मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोविड मृत्यूंची संख्या वाढणार असल्याचे सागंण्यात आले आहे. मात्र, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या शास्त्रज्ञांनी काढलेल्या निष्कर्षानुसार, जर शहरात ७५ टक्क्यांपर्यंत लसीकरण झाले, तर १ जूनपर्यंत कोविड मृत्यू दर आटोक्यात येण्याची शक्यता आहे.मुंबईमध्ये महिन्याभरात २० लाख नागरिकांचे लसीकरण होणं गरजेचं आहे, तरच जून महिन्यापर्यंत मृत्यूदर कमी होण्याची शक्यता आहे. १ जुलै किंवा त्यानंतर लवकरच शाळासुद्धा सुरु करता येऊ शकतात, असे टीव्हीएफआरचे अधिष्ठाता डॉ. संदीप जुनेजा यांनी सांगितलं. मात्र हे पूर्वानुमान असल्यानं यामध्ये चूक होण्याची देखील शक्यता आहे. जुलै महिन्याच्या जवळपास या सर्वांचे मूल्यांकन करता येईल, असंही जुनेजा म्हणाले.
www.konkantoday.com