खेड नगर परिषदेच्या कोविड केअर सेंटरने राबवला आगळा उपक्रम,कोरोनामुक्त झालेल्या एका रुग्णाला संगीताच्या तालावर दिला रुग्णालयातून निराेप

0
41

खेड नगर परिषदेच्या कोविड केअर सेंटरनेही असाच उपक्रम राबवला. कोरोनामुक्त झालेल्या एका रुग्णाला संगीताच्या तालावर रुग्णालयातून निराेप देण्यात आला
खेड कोविड केअर सेंटरचे डॉ. विक्रांत पाटील आणि त्यांच्या सहकार्यांनी हा उपक्रम राबवला जेव्हा एखादा रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतताे अशावेळी आपण अजूनरुग्णालयातच असल्याच्या विचाराने इतर रुग्णांच्या मनावरचा ताण वाढतो. म्हणूनच डॉ. पाटील आणि त्यांच्या सहकार्यांनी या कोरोनामुक्ताला निरोप देताना चक्क छोटेखानी कार्यक्रमच केला.
गाण्याच्या तालावर नृत्य करून या रुग्णाला निरोप देण्यात आला. टाळ्या वाजवत त्यात इतर रुग्णही सहभागी झाले. त्यामुळे वातावरण अतिशय हलकेफुलके झाले. याआगळ्या उपक्रमाचे सर्वांकडून स्वागत केले गेले
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here