महावितरणाने मोबाईल अ‍ॅप किंवा वेबसाईटद्वारे वीज ग्राहकांना स्वत:हून मीटर रिडींग पाठवण्याची सोय उपलब्ध केली

0
50

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे अनेक भाग आणि सोसायटी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. यामुळे महावितरणला मीटर रिडींग घेणे शक्य होत नाही. यामुळे महावितरणाने मोबाईल अ‍ॅप किंवा वेबसाईटद्वारे वीज ग्राहकांना स्वत:हून मीटर रिडींग पाठवण्याची सोय उपलब्ध करुन दिली आहे. तसेच आता SMS द्वारेही मीटर रिडींग ग्राहकांना मीटर रिडींग पाठवण्यात येणार आहे
कोरोना प्रादुर्भावामुळे महावितरणाला मीटर रिडींग घेणे शक्य होत नाही.वीजग्राहकांना स्वतःहून मीटर रिडींग पाठविण्यासाठी प्रत्येक महिन्यात केवळ दोन ते तीन मिनिटांचा कालावधी लागणार आहे. स्वतःहून रिडींग पाठविल्यास मीटरकडे आणि रिडिंगकडे नियमित लक्ष राहील. तसेच वीजवापरावर देखील नियंत्रण राहील. रिडींगनुसार वीजबिल आल्याची खात्री करता येईल. मीटर सदोष किंवा नादुरुस्त असल्यास त्याची तात्काळ तक्रार करता येईल. वीजबिलांबाबत कोणत्याही तक्रारी उद्भवणार नाहीत. मीटर रिडींग अचानक वाढल्यास त्याची कारणे शोधता येईल. शंका समाधानासाठी तक्रार करता येईल. यांसह इतर विविध फायद्यांमुळे वीजग्राहकांनी स्वतःहून दरमहा मीटर रिडींग पाठवावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here